औरंगाबाद- लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे विविध राजकीय पक्ष मित्र जोडण्याचे काम करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस डाव्या पक्षाचा आधार घेत असल्याचे दिसून येते. कन्हैय्याकुमारची सभा आयोजित करण्यामागेही राष्ट्रवादीचा हा एक उद्देश असल्याचे दिसते.
राज्यात काँग्रेस,
राष्ट्रवादी
काँग्रेस,
शिवसेना,
भारतीय जनता
पार्टी हे प्रमुख पक्ष आहेत. २०१४ मध्ये राज्यात काँग्रेस आघाडीचा पराभव
झाल्यानंतर आघाडीच्या नेत्यांमध्ये मरगळ आली होती. पण गतवर्षीपासून दोन्ही पक्ष
सरकारच्या विरोधात जनतेच्या, शेतकर्यांच्या,
बेरोजगारांच्या
प्रश्नावर रण मैदानात उतरले आहे. दोन्ही पक्षांनी आपआपले मित्र जोडणे सुरू केले
आहे. राज्यातील डाव्या विचारसरणीच्या मंडळीची काही भागात शक्ती आहे. या शक्तीला
आपल्या सोबत जोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे.
कम्युनिस्टांसह शेतकरी कामगार पक्ष व अन्य
छोट्या-मोठ्या संघटनांना जवळ करीत आहेत. केंद्रातील भाजप सरकारला पायउतार
करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रयत्न करीत आहेत. राज्यात मराठा आरक्षणाच्या
आंदोलनामुळे मराठा समाजाचा अनुमान येणे अशक्य असल्याने राष्ट्रवादीकडून ही
जुळवाजुळव सुरू आहे. कम्युनिष्ट पक्षाच्या एआयएसएफचा विद्यार्थी आघाडीचा राष्ट्रीय
उपाध्यक्ष कन्हैय्याकुमार यांची सभा घेऊन डाव्यांना आपल्या सोबत जोडण्याचा हा
राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतो. कन्हैय्याकुमारचे सभेचे शहरात मोठमोठे होर्डिंग्ज
लावून वातावरण निर्मिती केली आहे.
कन्हैय्याकुमार सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि भाजपवर टिका करणारी भाषणे करून प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे
राष्ट्रवादीने त्यास बोलावून डाव्यांना आपल्यासोबत जोडून आपली मताची पेटी मजबूत
करण्याचा प्रयत्न केला.